स्वामी समर्थांच्या पालखीचे आज पुण्यातून प्रस्थान
लोहगाव : टाईम्स प्रतिनिधी
श्री दत्त जयंती निमित्ताने पुणे ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पायी पालखी सोहळा मागील 21 वर्षापासून लोहगाव मधील दोन बंधूनी सुरू केली आहे. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पालखी पुण्यातून प्रस्थान झाली आहे.
पालखी लोहगाव मधील पै. संतोष नागनाथ भिसे व पै. किरण नागनाथ भिसे यां दोन बंधूनी सुरु केली. महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. लोहगाव म्हणजे श्री जगदगुरु तुकाराम महाराज याचे आजोळ आहे. या गावाला संताचा वारसा लाभला आहे.
ही पालखी बुधवार पेठ मंडई मठा पासून प्रारभ केला जातो. व पालखी चा पहिला मुक्काम हा श्री स्वामी विवेकानंद नगर सोसायटी किर्लोस्कर ब्रिज हडपसर यां ठिकाणी असतो. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक,महाआरती, भजन, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या श्री स्वामी समर्थ महाराज पालखी साठी लोहगाव, वाघोली, चंदननगर, खराडी, पुणे, हडपसर व इतर ठिकाणा हुन तीन ते चार हजार स्वामी भक्त दर्शना साठी येतात. देशभर श्री स्वामी समर्थ महाराजाची घडणारी प्रचिती,जीवनात घडणारे बदल, मिळणारे यश, त्याच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यां वाक्यातून जीवनात जगण्या मिळणारी नवी ऊर्जा हि एक दैव शक्तीचं आहे. या पालखी मागील हेतू एवढाच आहे की आपल्या युवा पिढीला वेसना पासून दूर ठेवणे हा आहे. स्वतःचे जीवन सुख मय करावे असे धडे यां प्रकारचे सामाजिक कार्य व स्वामी भक्ती मार्गात युवा पिढी प्रवृत्त व्हावी असा प्रयत्न व उद्धेश या पालखी मागील आहे. गेली 21 वर्ष अखंडीत चालू असलेली सेवा या सेवेत लोहगाव ग्रामस्थ मंडळीचा स्वामी भक्ताचा मोठा देणगी स्वरूपात सिहंचा वाटा असतो.


















