सुरेंद्र पठारे यांचा भाजप प्रवेश निश्चित
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बापुसाहेब पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र दादा पठारे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक महेंद्र पठारे, युवा नेते संतोष भरणे यांचा देखील भाजप मध्ये प्रवेश होणार आहे. या सर्वांना स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी स्ट्रॉंग असणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजप मध्ये प्रवेश देणार असल्याचे जाहीर केल्याने शिवाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील वडगावशेरी आणि हडपसर मतदार संघात प्रवेश घ्यावे लागतील असे जाहीर केल्याने या सर्वांचा प्रवेश निश्चित आहे. सुरेंद्र पठारे हे प्रभाग क्रमांक तीन विमानगर- लोहगाव- वाघोली मधून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या समोर कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार सुपुत्र सुरेंद्र पठारे हे भाजप मध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आणि बातम्या होत्या. मात्र अधिकृत माहिती समोर येत नव्हती. नुकतेच त्यांनी पत्रकारांशी अनऔपचारिक गप्पा मारताना विकास कामे करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून निधी मिळण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. यासाठी भाजप मध्ये प्रवेश करावा लागणार असल्याचे सांगितले. याच बरोबर आपण प्रभाग तीन मधून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेंद्र पठारे यांचा भाजप प्रवेश होणार असला तरी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असणा- या कार्यकर्त्यांची काय होणार असे विचारले असता, आमदार बापुसाहेब पठारे हे त्यांच्याकरिता नेते म्हणून कायम पाठीशी राहणार आहेत. प्रभाग तीन व चार मधून भाजप मध्ये प्रवेश होणार असले तरी प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये भारतीय जनता पार्टीत होणारे प्रवेश मात्र काही कारणामुळे थांबले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एक आणि दोन मधील इच्छुकानी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आपला मोर्चा वळविला आहे.















