सासर- माहेरकडील जनतेच्या आशीर्वादावर चौकार मारणार
सौ. रेखाताई टिंगरे यांना विजयाचा विश्वास
लोहगाव : (टाईम्स प्रतिनिधी)
२०१७ साली मोदी लाट असतानाही मला कळस- धानोरीच्या जनतेने निवडून देऊन विजयाची हॅट्रिक करण्याची संधी दिली. आता तर मी कळस- धानोरी या माझ्या सासर कडील जनते सोबत लोहगाव मधील माझ्या माहेर च्या जनतेच्या आशीर्वाद मिळणार असल्याने विजयाचा चौकार मारण्यास आपण सज्ज असल्याचा विश्वास माजी नगरसेविका सौ रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांनी लोहगाव टाईम्स शी बोलताना व्यक्त केला. रेखाताई यांचा १५ डिसेंबर ला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी प्रभागातील कलाकारांना संधी देण्यासाठी रिल बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. रेखाताई टिंगरे म्हणाल्या, मला जनतेने आता पर्यंत तीन वेळा आशीर्वाद दिला आहे. तीनही वेळेला माझ्या समोर वेगवेगळे उमेदवार होते. मात्र त्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. आता तर माझ्या समोर उभे राहणाऱ्या उमेदवार या नवख्या असणार आहेत. माझ्याकडे विकास कामांचा प्रचंड अनुभव आणि माझा व माझ्या पतीचा दांडगा जनसंपर्काच्या जोरावर मला चौथ्यांदा विजयाची खात्री आहे. पावसाळ्यात ज्या प्रकारे छत्र्या बाहेर पडतात त्याच पद्धतीने निवडणुका आल्या की प्रभाग एक कळस- धानोरी- लोहगाव प्रभागात अनेक ताई बाहेर पडतात. निवडणुका संपल्या की पुन्हा ताई लोक गायब होतात, मात्र लाडकी ताई म्हणून मी व माझे पती २४ तास सर्वांसाठी उपलब्ध असतो. कळस- धानोरीचा विकास झालाय आता लोहगावचा म्हणजेच माहेरचा विकास करण्यासाठी विकासाच रोल मॉडेल घेऊन मी लोहगाव मध्ये आली आहे. माहेरवाशीण मुलगी म्हणून लोहगावची जनता आशीर्वाद देतील. रेखाताई चंद्रकांत टिंगरे म्हणाल्या, धानोरीकराना पाण्याची समस्या होती त्यासाठी दोन पाण्याच्या टाक्या बांधल्या. भाजी मंडई, अग्निशमन केंद्र, मेडिटेशन सेंटर उभारले. उद्याने विकसित केली. कोकण वासियांसाठी कोकण भवन बांधले. रस्ते विकसित केले. विश्रांतवाडी मधील स्मशान भूमी विकसित केली. धानोरी भागातील अनेक विकास कामे झाली आहेत. त्याच पद्धतीने नव्याने समावेश झालेल्या लोहगाव मध्ये करावयाची आहेत. लोहगाव चा भाग नव्याने महापालिकेत आला आहे मात्र लोहगाव मध्ये रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत समस्यांचा अभाव आहे. ते जनतेला मिळालेच पाहिजेत असा आपला सर्व प्रथम प्रयत्न राहणार आहे. पोरवाल रोड सारख्या सोसायट्या मधील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी उद्यान, जॉगिंग ट्रॅक करण्याचा मानस आहे. खंडोबा डोंगर आपल्या प्रभागात आल्याने तळजाई टेकडी सारखा खंडोबा डोंगर विकसित केला जाईल. लोहगाव मधून जाणारे रस्ते पीसीएमसी हद्दीला जोडले जातील. भारत माता रोड चा रखडलेला प्रश्न मार्गी लावणार आहे. विकास आराखड्यातील सर्व रस्ते विकसित केले जातील. लोहगाव मधील जनतेला २४ तास पाणी देण्याचा आपला संकल्प आहे. मनपा तर्फे दर्जेदार शाळा, हॉस्पिटल उभारून गरीब जनतेची सेवा करणार असल्याचे रेखाताई यांनी सांगितले. कळस- धानोरी – लोहगाव मधील जनते मध्ये गेल्या नंतर आपली लाडकी ताई आल्याचे ऐकायला मिळत आहे. यामुळे आणखीन काम करण्याची ऊर्जा मिळते. लवकरच प्रभागातील आणखीन विकास कामाचे उद्घाटन करून जनतेसाठी खुली करणार असल्याचे देखील ताईंनी सांगितले.
अब की बार चौकार..! (सौ रेखाताई चंद्रकांत टिंगरे)















