सर्वाधिक उमेदवार येरवडा प्रभाग क्रमांक ६ मध्ये
निवडणुक विषयी शहर निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली माहिती
पुणे: प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या एकूण निवडणूक विषयक विविध कामकाजाची माहिती पुढील प्रमाणे:-
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४०११ मतदान केंद्रावर दिनांक १५.०१.२०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे.
१) अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांबाबत माहिती – (Contesting Candidates Info)
एकूण प्रभागांची संख्या – ४१
एकूण सदस्य संख्या – १६५
एकूण निवडणूक लढविणारे उमेदवार ११५३ (पुरुष-६२७, महिला-५२८)
सर्वाधिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा प्रभाग क्र.६ येरवडा (४३ उमेदवार)
सर्वात कमी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ३५ (५ उमेदवार)
बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या – २ (३५ ब व ३५ ड)
२) मतदान केंद्रा बाबत माहिती –
एकूण मतदान केंद्रांची संख्या :- १४०११
एकूण ठिकाणांची संख्या :- ९३२
१ केंद्र असलेले ठिकाण :- १६०
२ केंद्र असलेले ठिकाण :- १८०
३ केंद्र असलेले ठिकाण :- १३०
४ केंद्र असलेले ठिकाण :- ११५
५पेक्षा अधिक केंद्र असलेले ठिकाणांची संख्या:- २७१
१० पेक्षा अधिक केंद्र असलेल्या ठिकाणांची संख्या:- ७२
संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या : ९०६
अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या – ००
सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असणारे RO कार्यालय (सिंहगड – १७२ केंद्र)
सर्वात कमी संवेदनशील मतदान केंद्र असणारे RO कार्यालय
(शिवाजीनगर- २१ केंद्र)
एकूण महिला मतदान केंद्र (पिंक बूथ)- १६
एकूण आदर्श मतदान केंद्र – १४
वेब कास्टिंग करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या ८०२ (२०%)
एकूण परदानशीन मतदान केंद्र- २२
सोसायटी मधील मतदान केंद्र २५८ (सर्वाधिक वानवडी-रामटेकडी-६४, सर्वात कमी भवानी पेठ – 0)
पत्राशेड असलेले मतदान केंद्र- १७०
पत्रा/कापडी पार्टीशन असलेले मतदान केंद्र ७४१
(सर्व मतदान केंद्रावर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानूसार सुविधा (AMF) पुरविण्यात आलेले आहे.)
३) मनुष्यबळाबाबत माहिती –
१) मतदान केंद्रावरील मनुष्यबळ – २५८९९
२) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) – ४५४
३) एकूण नोडल अधिकारी ३२ (एकूण नोडल अधिनस्त कर्मचारी-२४००)
४) आरोग्य कर्मचारी -१२००
५) मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी – १०५६
(उपरोक्त सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.)
४) मतदार चिठ्ठी वाटप (Voter Slip Distribution) –
प्रत्यक्ष वाटपास दि.०८/०१/२०२६ पासून सुरुवात.
आज अखेर मतदार चिट्ठी वाटप – ८५%
मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत शोधणेकरिता pmcvotersearch.digielection.com सर्च इंजिन सुविधा
५) आदर्श आचारसहिंता (MCC) अमंलबजावणी कार्यवाही –
१) एकूण कार्यरत पथके – १७२
FST – ६०
SST-४७
VST – ४६
VVT -१९
एकूण कार्यरत कर्मचारी- ७१५
६) आचारसंहिता प्राप्त तक्रारी तपशिल –
एकूण प्राप्त तक्रारी – ५३
एकूण निर्गत तक्रारी – ४९
प्रलंबित तक्रारी – ४
ब) पाच जागांसाठी मतदान असणारे प्रभाग १ (प्रभाग क्र. ३८, जागा क्र.अ, ब, क, ड, इ)
पांढरा – जागा क्र. अ
फिकट गुलाबी – जागा क्र. ब
फिकट पिवळा जागा क्र. क
फिकट निळा – जागा क्र. ड
फिकट हिरवा – जागा क्र. इ
(प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवार / चिन्हासमोरील बटन दाबून प्रत्येकी एक मत असे एकूण ५ मते नोंदवावीत.)
२०) मतदाराची ओळख पटविण्याकरिता मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त पुढील १२ पुरावे ग्राह्य :-
१. भारताचा पासपोर्ट
२. आधार ओळखपत्र
३. वाहन चालविण्याचा परवाना
४. आयकर विभागाकडील ओळखपत्र
५. केंद्रशासन / राज्यशासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यानी आपल्या कर्मचाऱ्याना फोटोसहीत दिलेली ओळखपत्रे
६. राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
७. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहीत अपंगत्वाचा दाखला
८. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील, फोटो असलेले ओळखपत्र (MNREGA ऑव कार्ड)
९. निवृत्त कर्मचाऱ्याऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलचित व्यक्ती यांची फोटो उअसलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.
१०. लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा विधानपरिषद सचिवालय गांनी आपल्या सदस्याना दिलेली अधिकृत ओळखपत्र
११. स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
१२. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड
(मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये जाताना मोबाईल फोन नेता येणार नाही याची नोंद घ्यावी.)















