प्रभाग 1 शिवसेना
प्रभाग १ मध्ये प्रस्थापिता विरुद्ध शिवसेना हा सक्षम पर्याय
शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील : गिरीश जैवळ
धानोरी : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रस्थापित उमेदवारांना जनता कंटाळली आहे. नगरसेवक कोण होते हे माहिती नाही, मतदार नोटाचे बटण दाबून मतदान करणार होते. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचा धनुष्य बाण हा पर्याय मतदाराना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मतदार आनंदित आहेत. पैसे, भेट वस्तू वाटप करणाऱ्या प्रस्थापितांना मतदान करण्या पेक्षा आपले चारही उमेदवार सुशिक्षित सक्षम असून मतदार आपल्यालाच मतदान करतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख गिरीश जैवळ यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक एक मधील भैरव नगर, धानोरी परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, प्रदीप रावते, हेमलता विवेक बनसोडे यांनी प्रभागात पदयात्राद्वारे मतदारांशी संपर्क साधला.
गिरीश जैवळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडक्या बहिणीचा फायदा आपल्या सर्व उमेदवारांना होईल. आपण प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करणारा असून तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. मी स्वतः केली अनेक वर्ष या भागातील समस्या वर आंदोलने केली आहेत. नागरिकांच्या कायम संपर्कात आहे. त्याचबरोबर शिवसेनेला मानणारा या भागात जास्त कोकणी मतदार असल्याने आपला विजय नक्की असल्याचे त्यांनी सांगितले.
मीनाक्षी म्हस्के म्हणाल्या, माझे पती माजी नगरसेवक सतीश म्हस्के हे नगरसेवक असताना त्यांनी केलेले विकास काम आज ही लोक आठवण काढतात. कळस भागातील आपण एकमेव उमेदवार असल्याने आपल्यासह चारही उमेदवारांना त्या भागातून चांगले मतदान मिळणार आहे.
उमेदवार हेमलता बनसोडे म्हणाल्या, आपण व आपले सर्व उमेदवार सुशिक्षित असल्याने आपल्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उमेदवार प्रदीप रावते म्हणाले, एसटीची जागा सर्वसाधारण असताना विरोधी दोन्ही पॅनल मध्ये महिला उमेदवार देण्यात आले आहेत. त्या मधील एक उमेदवार या प्रभागाच्या बाहेरील आहेत. त्यामुळे मला व माझ्या संपूर्ण पॅनल ला मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे.















