वंदनाताई खांदवे यांनी घेतली प्रचारात आघाडी
घरोघरी जाऊन मतदारांशी केला संपर्क
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १ मधील लोहगाव मोझे नगर, डी. वाय.पाटील रोड परिसरात भाजपाच्या इतर मागास महिला गटातील इच्छुक उमेदवार वंदनाताई संतोषलाला खांदवे यांनी प्रचार केला. या परिसराला पाणी, पक्के रस्ते, ड्रेनेज, लाईट या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन वंदनाताई खांदवे यांनी दिले. यावेळी निलम मोझे, शोभा मोझे,.मीरा भांडक्कर, मनीषा सहाणे, रोशनी खांदवे, वनिता खांदवे, कावेरी खांदवे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
दुसऱ्या टप्प्यात साठे वस्ती मधील शांताई कॉलनी लेनं 1, 2, 3 याठिकाणी देखील घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी कृतिका लोखंडे,
बाळासाहेब लोखंडे, विरमती सावंत,निलम खांदवे, मंगल भिल्लारे आदी महिला उपस्थित होत्या.
मतदारांनी चांगला प्रतिसाद देत वंदनाताई खांदवे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला.
















