लोहगाव विमानतळावर फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
एप्रिल २०२५ पासून पुणे विमानतळ परिसरात अधुनमधुन दिसणारा प्रौढ नर बिबटया ११ डिसेंबर २०२५ पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, इंडियन एअर फोर्स, आणि पुणे एअरपोर्ट अथॉरिटी यांच्या संयुक्त मोहिमेव्दारे बिबट्याला सुरक्षितरित्या बेशुध्द करुन पकडण्यात आला.
हा बिबटया २८ एप्रिल २०२५ रोजी प्रथम आढळला. पुढील काही महिन्यांत त्याने विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करुन आत-बाहेर हालचाल चालू ठेवली होती. विमानतळाचा विस्तृत आणि संवदेनशिल परिसल लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना टीम ला करावा लागला. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे यांव्दारे सातत्याने निरीक्षण ठेवण्यात येत होते.

४ डिसेंबर २०२५ रोजी बिबटया पुन्हा भूमिगत बोगदयात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचे बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले, अतिरिक्त लाईव्ह निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले. त्यातून बोगद्याच्या आतील हालचाली अधिक अचूकपणे समजण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले. या माहितीच्या आधारे ११ डिसेंबर २०२५ रोजी सुमारे ३० जणांच्या संयुक्त पथकाने बिबटयाला अंदाजे ८० फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहिम आखली. नियंत्रित परिस्थितीत त्याला शांततामय बेशुध्द केले. अत्यंत मर्यादित जागा असूनही, वन्यजीव वैद्यक तज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी बिबटयाला यशस्वीपणे जेरबंद केले. बिबटयाला त्यानंतर बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय निरीक्षणासाठी हलवण्यात आले. बिबटया सध्या पूर्णपणे स्थिर असून पुढील निरीक्षणासाठी बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवलेला आहे.
सदर मोहिम आशिष ठाकरे, वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्य वनसंरक्षक विशाल चव्हाण, सहाय्य वनसंरक्षक मंगेश ताटे, मावळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपरिमंडळ अधिकारी श्रीमती शितल खंडके, अशोक गायकवाड, अनिल राठोड, विनायक ताठे, बाळासाहेब जिवडे, योगेश जाधव, श्रीमती प्रिया आकेन तसेच नेहा पंचसिमया रेस्क्यु टिम अध्यक्ष व सदस्य पुणे यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पडाली.














