• Home
  • सोशल
  • लोहगाव, वाघोली, विमाननगर परिसरात कचऱ्याचे ढीग
Image

लोहगाव, वाघोली, विमाननगर परिसरात कचऱ्याचे ढीग

लोहगाव, वाघोली, विमाननगर परिसरात कचऱ्याचे ढीग

लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
लोहगाव, विमाननगर, वाघोली, खराडी आणि वडगावशेरी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे प्रचंड ढीग साचलेले आहेत, ज्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेचा आणि आरोग्याचा सामना करावा लागत आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ कारणीभूत असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले असून, परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
नागरिकांच्या करातून चालणाऱ्या प्रशासनाकडून अशा प्रकारची निष्काळजी वृत्ती अत्यंत निषेधार्ह आणि गैरजबाबदार आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर यांना काँग्रेस चे कार्यकर्ते करीम शेख यांनी निवेदन दिले आहे. परिसरातील साचलेला कचरा तात्काळ हटवून, संबंधित आरोग्य अधिकारी व जबाबदार अधिकाऱ्यांकडून खुलासा घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोहगाव मध्ये तर जमा केलेला कचरा पाच पाच दिवस झाले उचलला जात नाही. मुकादम त्यांचे नेमून दिलेले काम करत नाही. स्वच्छ कर्मचाऱ्यांचा कचरा वेळेवर घेतला जात नाही त्यांना गाड्या उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. या गंभीर समस्येकडेवर घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी तातडीने लक्ष घालून कचऱ्याचा गंभीर प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.

याबाबत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे म्हणाल्या, कचरा घेऊन जाणाऱ्या गाड्या नादुरुस्त झाल्याने कचरा उचलला गेला नाही मात्र आता गाड्यांचे नियोजन केले आहे. लोहगाव मोठे असल्याने दोन आरोग्य कोटी करून कामकाजाचे नियोजन केले जाणार आहे.

फोटो: लोहगाव वाघोली रस्त्यावर एचपी पेट्रोल पंपावर साचून राहिलेला कचरा.

Releated Posts

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद लोहगाव टाईम्स : प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे लोहगाव मधील मेडिकल वगळता…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 31, 2026

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी राजारामबापू महाविद्यालयामध्ये लोकनेते राजारामबापू…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी श्री चैतन्य गौडीय तीर्थ सेवाश्रम, श्री रामधन पार्क,…

ByBylohegaontimeseditor@gmail.com डिसेंबर 27, 2025
Scroll to Top