लोहगाव मध्ये गो मातांची मिरवणूक
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
दिपावलीची सुरवात वसुबारस होते. लोहगावमध्ये वसुबारस निमित्त गो मातांचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी मध्ये मोठ्या संख्येनेगो माता, नागरिक सहभागी झाले होते. अतिशय भक्ती पूर्ण वातावरणात वसुबारस साजरी करण्यात आली. यावेळी रवि निंबाळकर, अमोल निंबाळकर, आप्पा तिरखुंडे, आदित्य खांदवे, ओंकार निंबाळकर, हर्बद खांदवे,
यश शहा,शुभम मोझे यासह व ७० लोकांचा समावेश झाले असल्याची माहिती उत्तरेश्वर तरुण मंडळ उपाध्यक्ष मयुर मुरकुटे यांनी दिली.
फोटो: सोबत
ओळ: लोहगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात गो मातेची पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.


















