लोहगाव मध्ये कोयता गँग ने तरुणावर केले वार
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
लोहगाव येथील दादाची वस्ती समोरील आर्या इलेक्ट्रॉनिक मध्ये काम करणाऱ्या अनिल उर्फ मोन्या लक्ष्मण भोगिरे (रा. संतानगर) या तरुण युवकावर गुरुद्वारा मधील टोळक्याने जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्यानी वार केले आहेत. दुकानात काम करणाऱ्या अनिल वर अचानक हल्ला झाल्याने अनिल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेहमी गजबजलेल्या दादाची वस्ती, आदर्श नगर कमान जवळील चौकात सायंकाळी साडेसात झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. लोहगाव पोलिस या गंभीर घटनेचा तपास करत आहेत.















