लोहगाव मधून मिलिंदबापू व उज्वलाताई खांदवे हाच पर्याय
लोहगाव : टाईम्स प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या नव्या प्रारूप रचनेनुसार प्रभाग क्र.-३ मध्ये लोहगाव, विमाननगर, सोमनाथ नगर आणि वाघोलीचा काही भाग समाविष्ट करण्यात आला असून या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिलिंद (बापू) खांदवे आणि उज्वला (ताई) खांदवे या दाम्पत्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना दोघांनीही या प्रभागात केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याच्या बळावर प्रबळ दावेदार म्हणून त्यांची नावे समोर येत आहेत. त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमात सात दुचाकी बक्षीस ठेवली आहेत. तर वीर नारी सन्मान, आणि गोल्ड मेडल विजेता सनी फुलमाळी यांनाही दुचाकी भेट दिली जाणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाची प्रभागात चांगली चर्चा आहे.
शालेय जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मिलिंद बापू खांदवे यांच्यावर जगदगुरु तुकोबा रायांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. शरदचंद्र पवार विचारांनी प्रभावित होऊन १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय राहून त्यांनी लोहगाव–विमाननगर–वाघोली परिसरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले. कोविड काळात अनेक नागरिकांना मदत करून त्यांनी जनमानसात आपली छाप उमटवली आहे.
लोहगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पारंपरिक पाठिंबा असला तरी विमाननगर, सोमनाथ नगर आणि वाघोली येथे संघटन बळकट करण्यासाठी खांदवे दाम्पत्य सातत्याने प्रयत्नशील आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील (अण्णा) टिंगरे यांच्यासह इतर पक्षांतील नेत्यांशीही मिलिंद बापू खांदवे यांचे चांगले संबंध आहेत. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत खांदवे दाम्पत्याला लाभ होणार, असे मानले जात आहे.
दोघेही इच्छुक असल्याने प्रभाग क्र.-३ च्या पॅनलमध्ये खांदवे दाम्पत्यातील एक जण निश्चित स्थान मिळवेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यांच्या कार्याचा आणि जनसंपर्काचा लाभ त्यांना निवडणूक प्रक्रियेत नक्कीच होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन वर्षा पूर्वी मिलिंद बापूनी घेतलेला चला हवा येऊ द्या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळेपासून बापूंची हवा आजही कायम आहे. उज्वला ताई या देखील बचत गट, महिला मंडळ यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवत असतात.
मिलिंद खांदवे म्हणाले, लोहगाव ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव असले तरी विकासापासून दूर आहे. त्यामुळे विकास हाच आपला अजेंडा आहे. नवीन विकास आराखड्यात केवळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे टाकली आहेत. गरिबांची घरे बाधित होत आहेत. आरक्षणातून पर्याय मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी येत्या महापालिकेत जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे.















