लोहगाव पोलिस स्टेशन मध्ये महिला हिंसाचाराचा पहिला गुन्हा दाखल
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत लोहगाव हे स्वतंत्र पोलीस स्टेशन 15 डिसेंबर पासून सुरू झाले आहे. पोलीस स्टेशन सुरू झाल्यापासून चार दिवसानंतर महिला हिंसाचाराचा पहिला गुन्हा १९ डिसेंबर रोजी दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांनी दिली.
पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा चंद्रेश तिवारी (वय २७ वर्षे अंदाजे व्यवसाय गृहिणी रा. ड्रीम स्काय सोसायटी, बैंक ऑफ बडोदाच्या पाठीमागे, लोहगाव) यांनी पती, सासू, नंनंद यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यानुसार पती १) चंद्रेश अशोककुमार तिवारी (वय ३७ वर्षे व्यवसाय नोकरी) २) सासू मालती अशोककुमार तिवारी (वय ६२ वर्षे व्यवसाय नोकरी), ३) नणंद आकांक्षा अशोककुमार तिवारी (वय २७ वर्षे व्यवसाय नोकरी), ४) मोठी नणंद रिचा पंकज त्रिपाठी (वय ४१ वर्षे, व्यवसाय गृहिणी) यांच्या विरोधात लोहगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. थोडक्यात हकीकत अशी,
फिर्यादी यांची फिर्याद की, दिनांक ०५/०२/२०२२ रोजी ते आजतागायत २१८/ए, हिम्मतगंज, एस्टेट उनानी मंडीकल कॉलेज, इलाहाबाद, उत्तर प्रदेश राज्य व ड्रीम स्काय सोसायटी, बैंक ऑफ बडोदाच्या पाठीमागे, लोहगाव, पुणे येथे राहत असताना पती १) चंद्रेश अशोककुमार तिवारी वय ३७ वर्षे व्यवसाय नोकरी २) सासु मालती अशोककुमार तिवारी वय ६२ वर्षे व्यवसाय नोकरी ३) नंनद आकांक्षा अशोककुमार तिवारी वय २७ वर्षे व्यवसाय नोकरी ४) मोठी नंनद रिचा पंकज त्रिपाठी वयं ४१ वर्षे व्यवसाय गृहिणी सर्व रा. २१८/ए. हिम्मतगंज, एस्टेट उनानी मेडीकल कॉलेज, इलाहावाद, उत्तर प्रदेश राज्य यांनी लग्न झाल्या पासून माझ्या आई वडीलांकडून पैसे घेऊन ये म्हणून तसेच वेगवेगळ्या घरगुती किरकोळ कारणावरुन वेळोवेळी हाताने मारहाण करुन, धमकी देवुन शिवीगाळ करत क्रुरतेची वागणुक देऊन माझा वारंवार मानसिक, शारिरीक छळ केला आहे. त्यामुळं तक्रार दिली आहे
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तपास करत आहेत.
चौकट
नागरिकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात. त्याचबरोबर घरपोडीचे गुन्हे सोनसाखळी चोरी यासह विविध गुन्हे होऊ नयेत यासाठी सतर्कता बाळगावी. पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांनी केले आहे.














