लोहगाव च्या विकासाचा बॅकलॉग भाजपा भरून काढणार
भाजपा उमेदवारांची लोहगाव परिसरात आशिर्वाद पदयात्रा
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 3 मधील गुरुद्वारा कॉलनी,भूकण वस्ती लोहगाव परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची आशीर्वाद पदयात्रा आयोजित केली होती. यावेळी लोहगाव परिसरात मागील काही काळात न झालेला विकासाचा बॅकलॉग, येत्या काळात भरून काढला जाईल असे आश्वासन भाजपा उमेदवारांनी दिले.
यावेळी प्रभाग क्रमांक तीन गट अ मधील उमेदवार सौ.श्रेयस प्रीतम खांदवे, गट ब मधील उमेदवार अनिल दिलीप सातव, क मधील उमेदवार सौ.ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि गट ड मधील उमेदवार रामदास दत्तात्रय दाभाडे उपस्थित होते.
या प्रचार दौऱ्याला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार दौऱ्यात प्रभाग क्रमांक 3 मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, झालेला विकास, पुढील विकासाची स्पष्ट दिशा स्पष्ट करत जनतेशी थेट संवाद साधला. तसेच उपस्थित नागरिकांनी चारही अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एकजुटीने या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कर्मभूमीवाशीय भाजप उमेदवारांच्या पाठीशी
लोहगाव मधील कर्मभूमी नगर मधील नागरिकांची रविवारी रात्री बैठक झाली या बैठकीत भाजपाच्या चारही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी सुनील खांदवे पाटील, मोहनराव शिंदे सरकार, यासह सुनीता सातव, सौ दाभाडे, सरिता खांदवे, ज्योती खामकर, रंजना पांडे, गौतम कुमार यासह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















