लोहगावातील रस्ते तातडीने मार्गी लावा: आमदारांच्या अधिकाऱ्यांना सुचना
लोहगाव: टाईम्स प्रतिनिधी
लोहगाव मधील डी.वाय. पाटील रोड, शिवशंभो पार्क, सोपाननगर, छत्रपती शिवराज चौक (काळूराम खांदवे नगर), पवार वस्ती, पठारे वस्ती, वॉटर पार्क रोड परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली. हे रस्ते तातडीने डांबरीकरण करावेत यासाठी आमदार बापुसाहेब पठारे यांनी अधिकाऱ्यांसोबत पहाणी केली. रस्त्यांची कामे वेळेत मार्गी लावावीत अशा सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शाखा अभियंता श्रीमती अश्विनी पाटील, कनिष्ठ अभियंता श्रीमती अश्विनी तोंदले, आप्पा पुराणे व इतर अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली.















