लोहगावचा विकास आराखडा जाहीर : हरकती-सूचना नोंदवण्यासाठी साठ दिवस
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे शहराच्या हद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०१७ मध्ये ९ गावे महापालिकेत समाविष्ट केली होती. त्यांचा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर करून तो प्रसिद्ध केला आहे. त्यावर आता नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी दिला आहे. या प्रारूप विकास आराखड्यात एकूण १७५ आरक्षणाचा समावेश आहे. लोहगावचा विकास आराखडा मंजूर झाल्याने विकास कामे करणे शक्य होणार आहे.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेने २०१८ मध्ये इरादा जाहीर केला होता. तत्कालीन अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाने आराखड्याचे काम सुरू केले होते. २०२० मध्ये कोरोनाची साथ आल्याने ‘डीपी’चे काम उप्प झाले. त्यामुळे मुदतीत हा ‘डीपी’ तयार करता न आल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपल्याने राज्य शासनाचे प्रशासकाची नियुक्ती केली. या काळातही डीपी तयार करण्याचे काम रखडले. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ घेण्यात आली होती. पण हा विकास आराखडा लवकर पूर्ण होत नसल्याने गेल्यावर्षी राज्य शासनाने हे काम महापालिकेकडून काढून घेतले आणि नगररचना विभागाकडे जबाबदारी दिली होती.
ही आहेत ९ गावे
- लोहगाव (उर्वरित),
- मुंढवा (उर्वरित केशवनगर),
- साडेसतरा नळी (हडपसर),
- शिवणे (उत्तमनगर),
- मौजे शिवणे (संपूर्ण
- उत्तमनगर), मौजे आंबेगाव
- खुर्द (उर्वरित), मौजे उंड्री
- (उर्वरित), मौजे धायरी
- (उर्वरित) आणि मौजे
- आंबेगाव बुद्रुक (उर्वरित).
सोबत च्या नकाशा मध्ये लोहगाव मध्ये आपण कोणत्या सर्व्हे नंबर ला काय आरक्षण आहे ते पाहू शकता















