लक्ष्मीनगर पोलिसांची धडक कारवाई; देशी पिस्तूलसह तरुणाला सापळा रचून अटक
पुणे: लक्ष्मीनगर पोलिसांनी सतर्कता दाखवत अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिस आयुक्तालयाकडून गुन्हेगारीला आळा घालण्याच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली.
गस्तीदरम्यान पोलिस अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील इंद्रप्रस्थ उद्यान गेटजवळ, हॉटमिक्स प्लांट परिसरात एक संशयित इसम देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून लक्ष्मीनगर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला. वर्णनाशी जुळणारा इसम फुटपाथवर थांबलेला आढळून आला.
पोलिसांनी त्याला हटकताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला जागीच पकडले. चौकशीत त्याने आपले नाव कुलतारसिंग नानकसिंग बावरी (वय २३), रा. अशोकनगर, येरवडा असे सांगितले. झडतीदरम्यान त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत राऊंड आढळून आल्याने त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त श्री. मनोज पाटील, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.रवींद्र कदम , तपास पथकाचे स.पो.नि . रविकांत नंदनवार,स.पो.नि. सावंत,
पो. हवा अडकमोड, पो.हवा निलख,पो.शि ९१४६ गद्दे, पो.शि ९८११ कांबळे, पो. शि १०७४९ गायकवाड, पो. शि ८८४२ जाधव, पो. शि २४९२ प्रदिप चव्हाण, पो. शि १७०२ शिंदे, पो. शि १०५५१ शिंदे
यांनी केली.














