राष्ट्रवादी पुण्यातल्या मातीतला पक्ष ;
चंदननगर येथील भाजी मंडई मध्ये जाहीर सभा
वडगावशेरी: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस हा पुण्यातल्या मातीतला पक्ष असून पुणेकरांनी आम्हाला भरभरून दिले आहे. त्यामुळे आमचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे पुणेकरांनो आम्हाला पुन्हा एकदा सत्ता द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
चंदननगर भाजी मंडई मध्ये प्रभाग क्रमांक ३,४ व ५ राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारार्थ अजित पवार यांची सभा आयोजित केली होती. यावेळी अजित पवार बोलत होते.

पवार म्हणाले, वडगावशेरी मतदार संघात आज काढलेल्या रोड शो ला मिळालेला प्रतिसाद पहाता विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नदी सुधार योजनेपेक्षा प्रथम शहर स्वच्छ केले पाहिजेत होते. कोयता गँग, रहिवाशी भागातील पब बंद करणार आहे. अवैध धंदे असलेल्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई केली जाईल. टँकर माफियांचे कंबरडे मोडणार आहे. माझ्या उमेदवारांच्या वाकड्यात गेला तर मी सोडणार नाही, मीही मोठ्या काकाचा पुतण्या असल्याचे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा म्हणून मेट्रो आणि पीएमपीएल ची सेवा मोफत दिली जाणार असल्याचे आपण सांगितले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर टीका केली? अजित पवार च्या घरचे आहे का? मात्र हे जनतेचे आहे जनतेला त्याचा लाभ मिळावा यासाठी आपण घोषणा केल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोकबापू पवार, शहराध्यक्ष सुनील टिंगरे यासह उमेदवार उपस्थित होते.















