राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने दिला राजीनामा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोमवारी दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास त्यांनी केलेला स्पष्ट विरोध त्यांना भोवला असल्याची चर्चा आहे. प्रशांत जगताप पुढे काय करणार याबाबत अद्याप स्पष्टता नसून ते काँग्रेसमध्ये जातील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा या समितीत प्रवेश आहे. या समितीतून जगताप यांना वगळण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जगताप यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक पार पडली असून त्यामध्ये राजीनामा देण्याचे निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुळे यांच्याकडे राजीनामा देण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.















