• Home
  • राजकीय
  • माता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत
Image

माता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत

माता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत
माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्द

लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाड्यात हाहाकार माजविला आहे. शेतकरी व सर्वसामान्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धानोरीतील माता जिजाऊ प्रतिष्ठानच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख एक रुपयांचा धनादेश देण्यात आला. माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. यावेळी चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, धिरज घाटे उपस्थित होते.
यावर्षी मे महिन्यापासूनच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यातच परतीच्या पावसाने विदर्भ व मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्याच्या हेतूने माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानने पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केली.
प्रतिष्ठानच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये आपत्तीग्रस्त व पुरग्रस्तांना मदत असो वा कोविड 19 काळात गरजवंताना मदत असो प्रतिष्ठान यामध्ये नेहमीच अग्रेसर असते. यापूर्वीही कोल्हापुर, सोलापुर, कोकण आदि भागात प्रतिष्ठानच्यामाध्यमातून अनेक वेळा मदत करण्यात आली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील ओल्या दुष्काळातून पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1,00,001 /- रुपये प्रदान करण्यात आले. लवकरच सांगोला तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन संसारोपयोगी वस्तूही देणार असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, जगदीश देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बाळासाहेब टिंगरे, शशिकांत भोसले, गिरीश यादव, जितेंद्र जगताप, स्वप्नील भोसले, कैलास गोसावी, मनोज पिल्ले, संदीप नाईक, गोपाल पाटील, कुणाल गुरसुंद, शरयू परब, संतोष कदम, संजय मोरे, दुर्गेश जंगम यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top