• Home
  • राजकीय
  • महापालिकेत दोन तृतीयांश नगरसेवक निवडून येणार; खराडी -वाघोली परिसरासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देणारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चंदननगर मध्ये सभा
Image

महापालिकेत दोन तृतीयांश नगरसेवक निवडून येणार; खराडी -वाघोली परिसरासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देणारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चंदननगर मध्ये सभा

महापालिकेत दोन तृतीयांश नगरसेवक निवडून येणार
; खराडी -वाघोली परिसरासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देणार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चंदननगर
मध्ये सभा

वडगावशेरी: प्रतिनिधी

विकासाची गाडी पुणे महानगरपालिकेसमोर उभी असून विकासाच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणून सर्व नगरसेवक निवडून द्या. विकसित पुणे जबाबदारी आमची असल्याने भाजपाचे दोन तृतीयांश नगरसेवक निवडून येतील, महापौर आमचाच होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

वाघोलीत विकासाच्या मुद्यावर पदयात्रा

प्रभाग क्रमांक ४ मधील भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी मंगळवारी (ता. ६) सकाळी व संध्याकाळी विविध भागांत पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. सकाळी बाईफ रोड येथील तलाठी कार्यालयापासून पदयात्रेला सुरुवात झाली. संभाजी नगर, नवनाथ मळा, आनंदनगर, एस.टी. कॉलनी मार्गे ही पदयात्रा अनुसया पार्क येथे समाप्त झाली. संध्याकाळी गणेश नगर येथून दुसरी पदयात्रा काढण्यात आली. डोमखेल रोड, शिवतेज पार्क, साई पार्क, रायसोनी कॉलेज, विनायक पार्क परिसरातून ही पदयात्रा पुढे जात आव्हाळवाडी रोड येथे समाप्त झाली.


पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदननगर येथील भाजी मार्केट येथे मंगळवारी (ता. ६) भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) व प्रभाग क्रमांक ०४ (खराडी-वाघोली) मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ०३ मधून ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, डॉ. श्रेयस प्रितम खांदवे, अनिल दिलीप सातव, रामदास दत्तात्रय दाभाडे, तर प्रभाग क्रमांक ०४ मधून सुरेंद्र बापूसाहेब पठारे, शैलजीत जयवंत बनसोडे, रत्नमाला संदीप सातव, तृप्ती संतोष भरणे हे उमेदवार उपस्थित होते. सभेला भाजपा महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, जिल्हाध्यक्ष: भाजपा पुणे (उत्तर) प्रदीप कंद तसेच स्थानिक माजी नगरसेवक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार सभेत बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, खराडी- चंदननगरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. आम्ही मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करणार आहोत. पुण्याचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ हेच करू शकतात. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील आठही नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन मंत्री बावनकुळे यांनी केले.

फोटो: चंदननगर येथील जाहीर सभेत प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील उमेदवारांची ओळख करून देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top