महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार यांचा मनमानी कारभार
सुशांत माने यांनी केला निषेध
लोहगाव : टाईम्स प्रतिनिधी
लोहगाव मधील स्वामी समर्थ नगर, साठे वस्ती यासह परिसरातील सर्वच रस्ते पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, पथ विभागाच्या वतीने खोदून ठेवले आहेत. खोदलेले रस्ते पुन्हा दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यापासून रस्ते खोदून ठेवले आहेत, रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने रस्ते दुरुस्ती करावी अन्यथा महापालिकेवर निषेध आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुशांत माने यांनी दिला आहे.
माने म्हणाले, भागातील मुख्य रस्ते पाणीपुरवठा विभागासह महापालिकेच्या ड्रेनेज विभाग, पथ विभागाने खोदले आहेत. खोदलेला रडारोडा आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखूरला असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली परंतु अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं अपेक्षित उत्तर त्यांच्याकडून मिळाले नाही. खोदकामची परवानगी नं घेता अनधिकृत प्रकरची खोदकामं करण्याची कामे सबंधित ठेकेदार करताना दिसून येतं असून या गोष्टीला नजरंदाज करण्याचे काम पालिका प्रशासनतील अधिकारी करताना दिसून येतं आहे. अनेक अपघात घडले आहेत परंतु या मनमानी कारभारला नागरिक त्रस्त होऊन भयभीत झाले आहेत. रस्त्यांची दुरावस्था करण्याचे काम सबंधित ठेकेदाराने केले आहे. सदर परिस्थिती पथ विभागाचे सुनील पोपळे, पाणीपुरवठा विभागाचे शुभम घाटकर यांच्याकडे तक्रार केली परंतु अधिकारी असमर्थ आहेत. तातडीने लोहगाव मधील सर्व रस्ते दुरुस्त केले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अधिकारी आणि ठेकेदारा विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुशांत माने यांनी दिला आहे


















