• Home
  • राजकीय
  • मतदार यादी पुनरावलोकनाचा कार्यक्रम जाहीर
Image

मतदार यादी पुनरावलोकनाचा कार्यक्रम जाहीर

मतदार यादी पुनरावलोकनाचा कार्यक्रम जाहीर

पुणे : लोहगाव टाईम्स प्रतिनिधी

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या मतदार यादी पुनरावलोकनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. मतदारांना आपल्या नावाविषयी, पत्त्याविषयी किंवा इतर तपशीलांबद्दल तक्रारी अथवा हरकती नोंदविण्यासाठी संधी दिली जाणार आहे.

प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि दुरुस्त्या नोंदवता येतील. या कालावधीत मतदारांनी आपल्या नावाची नोंद योग्य आहे का, त्यात काही त्रुटी आहेत का, हे तपासून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्राप्त हरकती आणि दुरुस्त्यांवर निवडणूक विभागाकडून योग्य ती छाननी करण्यात येईल.

या छाननीनंतर आणि सर्व आवश्यक दुरुस्त्या पूर्ण करून 28 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या अंतिम यादीतच पुढील महापालिका निवडणुकीसाठी पात्र मतदारांची नावे राहतील. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रकाशित केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदारांची अद्ययावत माहिती असेल.

महानगरपालिका निवडणुका अपेक्षित असल्याने, या मतदार यादीच्या कार्यक्रमाकडे राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदार यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांना आपली नावे मतदार यादीत निश्चित करण्याचे आवाहन केले असून, वेळेत हरकती किंवा दुरुस्त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान अद्याप आरक्षण च्या तारीख पुढे गेल्याने आरक्षण कधी होणार याची चर्चा सुरू आहे.

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top