भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अॅट अ टाइम” वाचन शिबिर
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल, लोहगाव फाउंडर्स वीक च्या अनुषंगाने तसेच डॉ. विश्वजीत कदम वाढदिवसानिमित्त वन पेज ॲट अ टाइम इव्हिनिंग रिडिंग कॅम्प या नावाने एक अत्यंत स्तुत्य आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असा वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमात इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थी, तसेच पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दररोजच्या धावपळीच्या जीवनात मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री व्हावी उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. नितीन हांडे हे उपस्थित होते. त्यांनी मुलांना मोबाईल-टीव्हीपासून दूर राहून ज्ञानसंपन्न वाचनाची सवय लागावी यासाठी शैक्षणिक अभ्यासा बरोबरच दररोज किमान 10 ते 15 मिनिटे व्यवहार ज्ञान वाढवणारे आणि सर्वांगीण विकासा करिता आवश्यक असणारे वैज्ञानिक, वैचारिक आणि सामाजिक विषयांचे अवांतर वाचन करणे बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.


प्रिंसिपल जॉर्ज पी.एस. यांनी देखील वाचन का महत्वाचे आहे हे सांगितले. मुलांना वाचणासाठी प्रेरित केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीची पुस्तके निवडून शांत वातावरणात वाचन केले. काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी वाचलेल्या पुस्तकांतील आवडते विचार,सारांश व प्रतिक्रिया दिल्या.कार्यक्रमात प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील घेण्यात आली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वाचन कौशल्य, शब्दसंपदा व सर्जनशील विचारसरणी विकसित होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काबीता दत्ता यांनी केले तर आभार आराधना मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संजीवनी सकट, अनामिका दुर्गे, कविता सवाखंडे व विनल बनसोडे यांनी केले


















