प्रस्थापितांना घाम फोडणारी पूजाताई , प्रभाग क्रमांक १ मध्ये सक्षम पर्याय
वाढदिवस विशेष लेख
सौ. पुजा जाधव यांचा जन्म बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात झाला. उच्चशिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकी व त्यानंतर कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. महाविद्यालयीन काळापासून विद्यार्थी व शेतकरी चळवळीसोबत काम केल्याने, उर्वरित आयुष्य सामाजिक व राजकीय चळवळीत घालवण्यासाठी पुजाताईंनी पुढाकार घेतला. शालेय शिक्षणाच्या काळात त्यांनी राज्यपातळीवर कब्बडी व देशपातळीवर सॉफ्ट टेनिस या खेळात अनेक पदके मिळवली.
मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नंतरच्या काळातील मुंबई येथील महामोर्चा येथे पुजाताई यांनी शिष्टमंडळात सहभाग घेवून आपल्या भाषणाने मराठा समाजाचे प्रश्न आणि ओबीसी व दलित समाजाच्या प्रश्नांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला. त्यानंतर गेवराई पंचायत समिती येथे वयाच्या २१ व्या वर्षी पुजाताई पंचायत समिती सदस्यपदी निवडून आल्या. महाराष्ट्रातील सर्वात तरुण पंचायत समिती सदस्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.
शेतकरी बहुल भागातील शेतकरी व कष्टकरी यांच्या प्रश्नांभोवती त्यांनी दीर्घकाळ काम केले. शेतीला हमीभाव मिळावा, ऊसाला व दुधाला योग्य दर मिळावा यासाठी बीड सह महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक आंदोलनांत पुजाताईंनी सहभाग नोंदवली. ऊस परिषदेत त्यांनी केलेल्या जोरदार भाषणाने शेतकऱ्यांना जागृत केले. येन तारुण्यात त्यांच्या आक्रमक आंदोलनमुळे 5 गुन्हे दाखल झाले पण त्या मागे हटल्या नाहीत त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात शेतकरी कन्या म्हणून ओळखले जाऊ लागले.
दिल्ली येथे केंद्र सरकारच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत आंदोलनात सहभाग घेण्यासोबतच तेथे महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्न देशपातळीवर मांडले.
मार्च २०२५ मध्ये पुजाताई यांचा विवाह स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांच्यासोबत झाल्यानंतर पुणे शहरातील नागरी समस्येसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांनी धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन ची स्थापना केली.
पावसाच्या सुरुवातीला प्रभाग क्र. १ कळस धानोरी लोहगाव मधील १० हजार नागरिकांना छत्रीवाटप करण्यात आले, तसेच प्रभागातील स्वच्छतासेवक, विद्यार्थी व मजूर यांना मोठ्या प्रमाणावर छत्री देण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी भक्तांना छत्री वाटप करण्यात आले.
त्यानंतर कळस – धानोरी – लोहगाव ग्रॅण्ड दहीहंडी फेस्टिवल २०२५ चे यशस्वी आयोजन पुजाताईंच्या वतीने करण्यात आले. या साठी इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंत यांचा लाईव्ह शो चे आयोजन व श्री कृष्णाच्या सामूहिक आरतीचे नियोजन करण्यात आले होते.
पावसाळ्यात प्रभागातील नागरी समस्यांबाबत त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देवून प्रशासनाच्या सहकार्याने कामे करून घेतली. यांत कचरा प्रश्न, नालेसफाई, रस्तांची कामे अशी अनेक कामे केली.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने फाऊंडेशन व पुजाताई यांच्या वतीने ग्रॅण्ड दांडिया फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. या फेस्टिवल चा निमित्ताने महिलांसाठी विशेष दांडिया सराव शिबिराचे आयोजन पुजाताईंनी केले होते.
दिवाळीच्या निमित्ताने प्रभागातील १०,००० नागरिकांना दिवाळी साहित्य किट चे वाटप पुजाताईंनी केले असून घरोघरी जाऊन महिलांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. महिलांसोबतचा संपर्क व वर्कृत्त्व यामुळे पुजाताई यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहिले जाते.
फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी आरोग्य शिबीरे, योगा – झुंबा कार्यशाळा, दांडिया-गरबा कार्यशाळा व तणावात असणाऱ्या स्त्रियांसाठी समोपदेशन सुरु केले त्यातून त्यांनी महिलांचे मोठे संघटन उभा केले. बचतगटातील महिलांना घेऊन त्या महिलांना घरात बसून रोजगार मिळेल असा उद्योग उभा करण्याच्या प्रयत्नात आहेत.
दांडगा संपर्क, सहज उपलब्धता, नागरी समस्यांची
जाण, प्रशासनासोबत कामांचा अनुभव, वक्तृत्व व सोबतीला शेकडो कार्यकर्त्यांची यंत्रणा यामुळे पुजाताईंकडे प्रभागातील नागरिक आशेने पाहत आहेत.
सौ. पुजाताई धनंजय जाधव वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !















