प्रभाग ३ मधील भाजपा उमेदवारांना मताधिक्यांनी निवडून आणणार: अशोकबापू खांदवे
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, लोहगाव मधील स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले ज्येष्ठ नेते अशोकबापू खांदवे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर तातडीने प्रचारात सक्रीय झाले आहेत. चारही उमेदवारांना नुसते निवडून नाही मताधिक्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
अशोक बापू यांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारात पदयात्रेत सहभागी झाले पठारे वस्ती, शंभू पार्क, सोपान नगर, पवार वस्ती, काळभोर वस्ती या ठिकाणी अशोक बापू खांदवे यांच्यासह उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये फुलांच्या वर्षात जोरदार स्वागत करण्यात आले. एकंदरीतच भाजपा उमेदवारांना अशोक बापूंच्या प्रवेशामुळे अधिक बळ मिळाले आहे.
यावेळी बोलताना अशोकबापू खांदवे म्हणाले, भाजपाच्या चारही उमेदवारांना आपण लोहगाव मधून मोठे मताधिक्य मिळवून देणार आहोत. यासाठी नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे.
















