प्रभाग २ मधील भाजपाच्या पॅनेलला वाढता पाठिंबा
एकतर्फी वाटणारी निवडणुक चुरस वाढली
येरवडा : प्रतिनिधी
फुलेनगर- नागपूर चाळ प्रभाग क्रमांक २ भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार ऍड. रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे ,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत आदिती बाबर यांनी महाराष्ट्र हौशिंग बोर्ड याठिकाणी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना रेणुकाताई यांनी विकासाची पायाभरणी करत स्वच्छ व पारदर्शक कारभारावर भर देणार असून धोकादायक घरांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजपा आरपीआय महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन चलवादी यांनी केले. दरम्यान प्रभाग दोन मधील निवडणुक एकतर्फी वाटत होती. मात्र भाजपा- आरपीआय च्या या तरुण, सुशिक्षित उमेदवारानी मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचारावर भर दिला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार आघाडीवर असून प्रभागात चुरस निर्माण झाली आहे.
त्यानंतर चारही उमेदवारांनी राजीव गांधी नगर,नानासाहेब परुळेकर शाळा , फुलेनगर ,हरीगंगा सोसायटी ,पोलीस लाईन या भागात पदयात्रेद्वारे मतदाराशी संवाद साधला.
रामदास आठवले यांची आज रॅली
पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी – आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक 2 (फुलेनगर -नागपूरचाळ) चे अधिकृत उमेदवार उमेदवार ऍड. रेणुका हुलगेश चलवादी , सुधीर सुभाष वाघमोडे, कुमारी आदिती गणेश बाबर, राहुल भगवानराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी दिनांक १० रोजी सायंकाळी 6 वाजता येरवडा पोस्ट ऑफिस या ठिकाणापासून केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले स यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. आहे .त्यानंतर लुम्बिनी गार्डन म.हौ.बोर्ड या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे, तरी आपण हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.















