प्रभाग १ मध्ये शिवसेनेने रॅली काढत प्रचाराची केली सांगता
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
शिवसेना प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना (शिंदे गट) सेनेच्या वतीने संपूर्ण प्रभागात रॅली काढत प्रचाराची सांगता केली. प्रचार रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपलेच पॅनेल विजयी होणार असल्याचा दावा पॅनेल प्रमुख गिरीश जैवळ यांनी व्यक्त केला.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार
हेमलता बनसोडे (अ गट),प्रदीप रावते (ब गट), मीनाक्षी म्हस्के (क गट) व गिरीश जैवळ (ड गट) यांनी दहा दिवस प्रभाग क्रमांक १ कळस – धानोरी-लोहगाव मध्ये जोरदार प्रचार केला. चारही उमेदवार चारही भागातील उच्च शिक्षित असल्याने मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी, पदयात्रा, रॅली याद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे, लाडकी बहीण योजना, लोकांपर्यंत पोहचवत होते. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री भरत गोगावले, विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आदींच्या सभा झाल्या.
जैवळ म्हणाले, स्थानिक उमेदवारां समोर निवडणुक लढविण्यासाठी नागरिक घाबरतात. मात्र आपण लढवत आहोत. वाराही उमेदवार मिळून एकत्रित प्रचार केला. मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मतदारांचा चांगला प्रतिसाद पहाता आपले चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास गिरीश जैवळ यांनी व्यक्त केला.















