प्रभाग १ मध्ये शिवसेना शिंदे गटाने ईव्हीएम फोडल्या आणि जाळल्या
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुण्यातील प्रभाग क्रमांक १ मधील कळस याठिकाणी शिवसेना (शिंदे गट) व रिपब्लिकन सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीन फोडत या मशीन जाळल्या. कळस गावामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मत मिळाल्याने शिवसेना शिंदे आक्रमक झाली. लोकशाहीला काळीमा फासण्याची घटना या निवडणुकीत झाल्याचा निषेध करत विवेक बनसोडे यांनी ईव्हीएम मशीन हातोड्यांनी फोडली तर गिरीश जैवाळ आणि सतीश म्हस्के यांनी ईव्हीएम मशीन पेट्रोलने पेटवून दिल्या. ईव्हीएम विरोधात प्रभाग एक कळस- धानोरी – लोहगाव मधून आंदोलन सुरू झाले असून यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही बोलणार असल्याचे जैवळ यांनी सांगितले. आम्हाला मतदारांकडून चांगला प्रतिसाद होता असे असताना मतदान कसे 4काय कमी झाले नक्कीच ईव्हीएम बाबत आपली शंका असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सतीश मस्के म्हणाले, ईव्हीएम हटवून मतदान बॅलेट पेपर वर घेतले पाहिजेत. तरच लोकशाही टिकणार आहे. यावेळी म्हस्के यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले. या निवडणुकी विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे मस्के यांनी सांगितलं.
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाले होते. यावेळी सतीश म्हस्के, गिरीश जैवळ, विवेक बनसोडे, मीनाक्षी म्हस्के, हेमलता बनसोडे, प्रदीप रावते, युवराज बनसोडे, जनार्दन वाघमारे, मारुती जाधव, नानासाहेब देवकर, वंदना देवकर, आशा परदेशी, कमल देवकर, प्रमिला देवकर उपस्थित होते.
















