प्रभाग १ मध्ये मनसेचे रेल्वे इंजिन सुसाट
मीनाताई माने यांनी खंडोबा माळ मधील महिलांशी साधला संवाद
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग १ मधील शिव युतीच्या उमेदवार सौ. मीनाताई माने इंगुळकर यांनी खंडोबा माळ येथे महिलां सोबत सवांद साधला. भागातील रस्ते , ड्रेनेजच्या समस्या, पाणी त्याबाबतच्या मागण्या यावर सविस्तर आणि थेट चर्चा झाली.
यावेळी “स्थानिक उमेदवाराला संधी द्या” असे आवाहन मीनाताईंनी केले. त्याला प्रतिसाद देत येथील महिलांनी ठाम आश्वासन दिले की यंदा स्थानिक उमेदवारालाच निवडून देणार असून एससी प्रवर्गातून फक्त मीनाताई माने यांनाच पाठिंबा देणार असल्याचा विश्वास खंडोबा माळ मधील महिलांनी दिला. महिलांच्या एकजुटीने खंडोबा माळ येथे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान प्रभाग १ मध्ये एससी उमेदवार हा बाहेरील असल्याने मनसेच्या उमेदवार मीनाताई इंगुळकर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने रेल्वे इंजिन सुसाट असल्याची चर्चा मतदारांमध्येच आहे.
फोटो: शिवयुती (मनसे) उमेदवार मीनाताई माने इंगुळकर यांनी लोहगाव मधील खंडोबा माळ परिसरात महिलांशी संवाद साधला.















