प्रभाग एक मधील शिवसेना- मनसे च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्नेहल आंबेकर यांची पदयात्रा
धानोरी परिसरातील पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
धानोरी: प्रतिनिधी
धानोरी-कळस-लोहगाव प्रभाग क्रमांक १मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व शिवसेना(उबाठा)गटाच्या अधिकृत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवार लक्ष्मी उर्फ मीनाताई माने(इंगुळकर) यांच्या प्रचाराच्या पदयात्रेला उत्र्स्फुत प्रतिसाद मिळाला. यावेळी उमेदवार सोमनाथ खांदवे, गायत्री नटराज साळुंखे उपस्थित होते.
धानोरी गावठाण येथील भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडुन पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुंजाबावस्ती, चौधरी नगर, गोकुळ नगर मार्गे पदयात्रा भैरवनगर येथे समाप्त झाली.

या पदयात्रेत प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उबाठा गटाच्या मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, शांताराम आबा खलसे, दत्तात्रेय टिंगरे, गोविंद नाना परांडे, राहुल परांडे , शंकर तात्या टिंगरे , बाळासाहेब चौधरी आदी नागरिकांसह शशी देवकर, संदीप कांबळे, विकी धोत्रे, संजय मोझे, एकनाथ खांदवे, अजिंक्य अहीलेकर, आकाश खांदवे, सुनील तावडे , गणपत घोरकुंड, किशोर सोळंके, सूर्यकांत चरक तसेच मनसेच्या माजी नगरसेविका सुनीता अनिल साळुंखे, नटराज साळुंखे, आखिल जाधव, उमर मुजावर, राम जाधव, सचिन सदभैय्या, योगेश महिंद्रकर संदीप गुंजाळ, श्रीकांत गुंजाळ, ज्ञानेश्वर मोरे, अतुल इंगुळकर, तुषार इंगुळकर, सागर ठोंबरे आदी उपस्थित होते. मनसेचे इंजिन घराघरात पोहचविण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी यावेळी परिश्रम घेतले.















