प्रभाग एक एससी उमेदवारी मध्ये ऐश्वर्या पवार यांची जोरदार एन्ट्री
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक एक कळस- धानोरी- लोहगाव या प्रभागातून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून महायुती कडून प्रबळ दावेदार म्हणून ऐश्वर्या वैभव पवार यांची जोरदार एन्ट्री झाली आहे. एक सुशिक्षित, सुसंस्कृत महिला म्हणून ऐश्वर्या पवार यांच्याकडे मतदार पहात आहेत.
ऐश्वर्या पवार म्हणाल्या, माझे शिक्षण Master of Business Administration in Human Resource Management (M.B.A. (H.R.)), पुणे महानगरपालिका २०२६ निवडणुकीत अ अनुसूचित जाती (SC) महिला या प्रवर्गातून आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहेत. सन २०१७ च्या निवडणुकीमध्ये माझे पती वैभव संजय पवार यांना आपल्या सर्वांनी मनापासून साथ दिली आणि तुल्यबळ मतांची ताकद दिली. त्या विश्वासाचे मी मनःपूर्वक ऋणी आहे. आज हाच विश्वास माझ्या पुढील प्रवासासाठी प्रेरणादायी आधार आहे.
मी शिक्षणानंतर HR क्षेत्रात कार्यरत असताना, युवकांच्या कौशल्यविकासासाठी BARTI, Tata Strive, Light House तसेच इतर महानगरपालिका कौशल्य केंद्रांमार्फत शासकीय प्रशिक्षण संस्थांद्वारे उपलब्ध असलेल्या IT, Cyber Security, Hospitality, Retail, Business Development, Beauty Parlour अशा विविध व्यावसायिक कोर्सेसची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. या कोर्सेसविषयी योग्य मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास प्रोत्साहित केले, तसेच त्यांच्या प्लेसमेंटसाठी व रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत व समन्वय साधण्याचे कामही केले.
समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजना पोहोचाव्यात, हक्काची मदत मिळावी, यासाठी मी व माझे पती सातत्याने RTE, PM SVANidhi, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य, मुख्यमंत्री सहाय्य निधी, विधवा पेन्शन, लाडकी बहिण योजना, ज्येष्ठ नागरिक योजना अशा अनेक शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करत असून, अनेकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला आहे. तसेच मी सर्वे महापुरुषांची जयंती, विविध उत्सव, पंढरीची वारी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच योगा डे, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपणआणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रीयपणे भाग घेत असते.
मी व माझे पती आयुक्त, सहाय्यक आयुक्त, PMC Care App, आणि संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क ठेवूनरस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, स्वच्छता, उद्याने, वाहतूक व्यवस्था, प्रकाशयोजना, CCTV, भूमिगत विद्युतिकरण अशा प्रभागातील मूलभूत सुविधांवर सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत. कोविड काळातही आमच्या कुटुंबाने अन्नधान्य, रेशन किट, औषध फवारणी, हॉस्पिटलमध्ये बेड अशी अत्यावश्यक मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माझे पती त्यांच्या कॉलेज जीवनापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक हक्कांसाठी सातत्याने काम करत आहेत. शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, जात पडताळणी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाची सोय, शालेय साहित्याचे वाटप, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तरुणांसाठी रोजगार, कौशल्यविकास, स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, जात पडताळणी, वस्तीगृह आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही सातत्याने कार्यरत आहोत.
शांतीनगर येथील Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan उभारणीसाठी माझे पती यांनी आंदोलन, निवेदने व सतत पाठपुरावा करून मोठी भूमिका बजावली. वारंवार मुख्यमंत्री आणि समाजकल्याण मंत्र्यांना निवेदन देत या कामाला गती मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज त्या ठिकाणी समाजकल्याण विभागाचे भव्य भवन, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रासह महामंडळ कार्यालयात विविध सेवा सुरू असून, त्याचा थेट फायदा प्रभागातील विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे.
माझे माहेर व सासर दोन्ही घराणे अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. तीन पिढ्यांपासून आमचे कुटुंब समाजसेवेत आहे, आणि त्याच्याच प्रेरणेने मला बालपणापासून समाजकार्याची प्रेरणा मिळाली. माझे सासरे-सासूबाई, पती वैभव पवार आणि मी स्वतःही गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांमध्ये मन लावून कार्य करत आहोत.
आमच्या कामाला अजून गती मिळावी आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला आपल्या विश्वासाने संधी द्यावी, अशी नम्र विनंती ऐश्वर्या पवार यांनी मतदारांना केली आहे.
फोटो: सौ. ऐश्वर्या वैभव पवार
(Μ.Β.Α. (H.R.))















