पूजाताई जाधव यांनी केला सर्वात मोठा महायज्ञ
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
अखिल विश्व गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार – गायत्री परिवार, पुणे आयोजित राष्ट्रजागरण २४ कुंडीय श्री गणेश गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सौ पुजा धनंजय जाधव यांनी सेवा केली अतिशय भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात हा महायज्ञ संपन्न झाला. धनेश्वर विद्यालयाच्या मैदानात हा महा यज्ञ भक्ती पूर्ण वातावरणात पार पडला.
या महायज्ञासाठी हजारो भाविकांनी उपस्थित लावली व शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला. यासाठी अखिल विश्व गायत्री परिवार यांचे मोलाचे सहकार्य यावेळी मिळाले. या महायज्ञासाठी माजी नगरसेवक अनिल उर्फ बॅाबी टिंगरे, ज्ञानेश्र्वर कुंभार महाराज, मनोज पोचट, मुकेश गोयल, विनीत वाजपेयी यांच्यासह अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
ओळ: धानोरी येथे सर्वात मोठ्या महायज्ञ मध्ये सौ व श्री पूजाताई धनजंय जाधव यांच्यावर पुष्पवृष्टी करताना अध्यात्मक क्षेत्रातील मान्यवर.















