पुण्यात एकूण १३१ उमेदवारी अर्ज बाद
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आलेल्या ३ हजार ५२ उमेदवारी अर्जाची छाननी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. यामध्ये १३१ उमेदवारी अर्ज बाद झाले असून २ हजार ३९७ अर्ज वैध ठरले आहेत. इतर काही क्षेत्रिय कार्यालयांची छाणनी सुरूच होती.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत अर्जाची छाननी करण्यात आली. १६५ जागांसाठी ३ हजार ५२ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजता सुरू झालेली छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अनेक क्षेत्रिय कार्यालयात अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे रात्री उशारापर्यंत सुनावण्या सुरू होत्या.
रेश्मा भोसले, जगताप, नंदिनी धेंडे, बागवेंना दिलासा
प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर जानवडीच्या भाजपच्या रेश्मा भोसले यांच्या अर्जात मालमत्तेवर थकबाकीबाबत आक्षेप घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली होती. मात्र, आक्षेप फेटाळल्याने त्यांना दिलासा मिळाला. तसेच, प्रभाग क्रमांक ३६ धनकवडी सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहारध्यक्ष सुभाष जगताप, काँग्रेसचे अविनाश बागवे यांच्याही अर्जावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. येरवड्यात नंदिनी सिद्धार्थ धेंडे, रेणुका चलवादी यांच्या अर्जावरही आक्षेप घेण्यात आले होते मात्र निवडणूक निर्णय अधिकारी सचिन भारुडकर यांनी आक्षेप फेटाळले. येरवडा प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना (उबाठा) च्या दोन उमेदवारांनी एकाच गटात दोघांनी एबी फॉर्म आणले होते. यामध्ये वाल्हेकर यांच्या AB फॉर्म मध्ये खाडाखोड असल्याने असल्याने त्यांचा पक्षाचा अर्ज बाद करून अपक्ष ठेवण्यात आला. तर भालेकर यांचा एबी फॉर्म वैद्य ठेवण्यात आला.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अर्ज छाननी मध्ये शैलजीत बनसोडे आणि भय्यासाहेब जाधव या दोघांचेही भाजपाचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. मात्र यामध्ये शैलजीत बनसोडे यांनी पक्षाचे लेटर जोडल्याना ते भाजपाचे अधिकृत उमेदवार राहतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऐश्वर्या पठारे यांच्या अर्जावर उज्वला मिलिंद खांदवे यांनी आक्षेप घेतला होता. तो आक्षेप फेटाळण्यात आला. नारायण गलांडे यांच्या अर्जावर सचिन भगत यांनी आक्षेप घेतला होता. मात्र नंतर माघार घेतला. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नेहा शिंदे आणि हेमंत बत्ते यांनी प्रभाग क्रमांक ३ ड मधून दोघांनीही उमेदवारी अर्ज AB फॉर्म सह दाखल केला आहे. यापैकी कोण माघार घेते याबाबत उत्सुकता आहे.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय वैध अर्ज अवैध अर्ज
क्षैत्रिय कार्यालय वैध अर्ज अैध अर्ज
- येरवडा–कळस–धानोरी : २४८ २४६ २
- नगर रोड–वडगावशेरी : २४३ २०१ ४२
- कोथरूड–बावधन : १७४ १५८ १६
- औंध–बाणेर : ११३ १०१ १२
- शिवाजीनगर–घोले रोड : १५९ ५६ ३
- ढोले–पाटील रोड : १२२ ११४ ८
- हडपसर–मुंढवा : ३४२ – –
- वानवडी–रामटेकडी : २६३ २६१ २
- बिबवेवाडी : २३८ २३१ ७
- भवानी पेठ : २९४ २८० १४
- कसबा–विश्रामबाग वाडा : १८२ – –
- वारजे–कर्वेनगर : १७१ १७१ ०
- सिंहगड रोड : १६७ १६२ ५
- धनकवडी–सहकारनगर : १४२ १३१ ११
- कोंढवा–येवलेवाडी : ९४ ८५ ९
- एकूण अर्ज : ३०५२ २३९७ १३१
लोहगाव टाईम्स वृत्त















