नागरिकांशी संवाद साधत
प्रभाग ३ मधील भाजपा उमेदवारांचा प्रचाराचा समारोप
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (ता. १३) प्रभाग क्रमांक ०३ (विमाननगर-लोहगाव) मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी ग्रीन पार्क, कलवड, डिफेन्स कॉलनी व फॉर्च्युन सिटी, कर्मभूमी नगर, वृंदावन पार्क या भागांमध्ये दुपारपर्यंत नागरिकांच्या भेटी घेतल्या.
भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, सूचना व प्रश्न ऐकून घेण्यात आले. मतदान कसे करावयाचे याचे प्रात्यक्षिक उमेदवारांनी मशीनवर दाखविले.
प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत मिळालेले प्रेम, पाठिंबा व मार्गदर्शनाबद्दल उमेदवारांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले.
यावेळी अ गटातील श्रेयस प्रितम खांदवे, ब गटातील अनिल दिलीप सातव, क गटातील ऐश्वर्या सुरेंद्र पठारे व ड गटातील रामदास दत्तात्रय दाभाडे यांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवर्जून सांगितले.
















