नुकताच नवरात्र उत्सव मोठ्या धामधूम मध्ये पार पडला. पुणे महानगर पालिका निवडणुक जवळ आल्याने नवरात्र उत्सवाला राजकीय रंग आला. नवरात्र म्हटला की गरबा, दांडिया आलाच याच संधीचा लाभ उठवत खराडी आणि विमान नगरमध्ये सुरेंद्र बापुसाहेब पठारे, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी तर धानोरी-लोहगाव मध्ये धनंजय जाधव व पूजा धनंजय जाधव यांनी ग्रँड दांडिया आयोजित केला होता. यांचे गरब्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मिडियावर या दोन्ही जोड्या नवरात्री मध्ये ट्रेंडिगला होत्या. सर्वत्र यांचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत होते. तर तरुणाई सह अबाल वृद्धा मध्ये या दोन्ही नवविवाहित जोडप्यांची चर्चा सर्वत्र होती.
1. सुरेंद्र पठारे व ऐश्वर्या पठारे

2. धनंजय जाधव व पूजा जाधव

सौ व श्री पठारे आणि सौ व श्री जाधव या दोन्ही जोडप्यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहे. सुरेंद्र पठारे व ऐश्वर्या पठारे हे प्रभाग तीन विमाननगर- लोहगाव मधून निवडणुकीची तयारी करत आहेत. तर धनंजय जाधव व पूजाताई जाधव हे प्रभाग क्रमांक एक कळस – धानोरी- लोहगाव मधून निवडणुकीची तयारी करत आहेत. निवडणुका जवळ आल्याने नवरात्र उत्सवाची संधी साधून लोकांची गरज ओळखून या दोघांनीही आपल्या आपल्या प्रभागात ग्रँड दांडियाचे आयोजन दोन दिवस केले होते. दांडियाला कॉर्पोरेट लूक देऊन सर्व सुविधा गरबा शौकीनाना उपलब्ध करून दिल्या होत्या. या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने आयोजकही नागरिकांच्या उत्साहात बघून नाचत होते. या कार्यक्रमांचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. सोशल मिडियावर या दोन्ही जोडप्यांच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ ट्रेंडिग ला होते. त्या पाठोपाठ लोहगाव मधील आदित्य खांदवे व प्रियाताई आदित्य खांदवे यांनी देखील ग्रँड दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला देखील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
राजकीय इच्छुकांनी देवीच्या आरतीसाठी सर्वत्र हजेरी लावून संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रॅड गरबा चे आयोजन करून सौ व श्री पठारे आणि जाधव जोडप्यांनी केलेल्या कार्यक्रमामुळे त्यांचा ट्रेंड सोशल मिडियासह चर्चेत कायम राहिला. आता याचा राजकीय फायदा किती होईल हे आगामी काळात कळणार आहे.

















