नवनिर्वाचित नगरसेवकांची अधिकाऱ्यांसमवेत लोहगाव मध्ये पहाणी
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि प्रभाग क्रमांक ३ विमाननगर- लोहगाव – वाघोली मधील नूतन नगरसेवकांनी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकाऱ्यांसोबत पहणी दौरा केला. लोहगाव – वाघोली रस्त्यावरील जगद्गुरु कॉलनी, योजना नगर भागातील ड्रेनेज, पाणी, रस्ता याबाबत पहाणी केली. नागरिकांनी देखील समस्या मांडल्या. यावेळी ड्रेनेज विभाग, पाणी पुरवठा विभाग, पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत महापालिकेच्या संपर्क कार्यालयात बैठक घेतली. नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकाऱ्याकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, नवनिर्वाचित नगरसेवक रामदास दाभाडे , अनिल सातव, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, डॉ श्रेयस खांदवे, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, कार्यकारी अभियंता विशाल हरिभक्त, युवराज हांडे, कनिष्ठ अभियंता सिद्राम पाटील, शुभम घाटकर, प्रीतम खांदवे, राजेंद्र खांदवे, दासआप्पा खांदवे यासह नागरिक उपस्थित होते.
















