नगर रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत मतदान जनजागृती
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 च्या पार्श्वभूमीवर नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या मतदार जनजागृती कक्षामार्फत प्रभाग क्रमांक तीन, चार व पाच येथे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही अधिक बळकट करावे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. खराडी व लोहगाव या परिसरामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मतदान करण्यासाठी सर्व नागरिकांना रॅली काढून आवाहन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमासाठी मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी भूषण जोशी, तहसीलदार तसेच नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय पोळ, जनजागृती कक्षाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, मुकुंद घम, समीर खुळे,विनायक भोरडे , गोपाळ कृष्ण नायडू, नितीन शिंदे उपस्थित होते. दिनांक २६ डिसेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत हे अभियान राबवण्यात आले.
१) लोहगाव येथील महापालिकेच्या शाळेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.
२) मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी झालेले नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी.
















