धानोरीत वंदनाताई खांदवे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
भाजप इच्छुक उमेदवार वंदना खांदवे पाटील यांच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन कळस–धानोरी–लोहगाव प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार वंदना संतोष खांदवे पाटील यांच्या वतीने महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम धानोरी येथील धनेश्वर मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांची उपस्थिती लाभली. तसेच संतोषलाला खांदवे पाटील, प्रीतम खांदवे पाटील, दत्तात्रय टिंगरे, मंगेश गोळे, बंटी म्हस्के, विशाल टिंगरे, संदीप लांडगे, दीपक बापू मोझे, माऊली पवार, मिलिंद बापू खांदवे पाटील, सुधीर काळभोर, रावसाहेब राखपसरे, आदित्य खांदवे, राजू केशरकर, रवी गणाचारी, दिलीप राखपसरे, नाना खांदवे, सूरज निंबाळकर,सौ. यशोदा केशरकर, सौ. सुरेखा राखपसरे, सौ. मीनाताई इंगुळकर, सौ. कांचन साठे, सौ. ऐश्वर्या जाधव, सौ. संगीता दांगट, सौ. अल्पना मोझे, सौ. रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, प्रश्नोत्तरे व संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यक्रमाला सुमारे ४००० ते ५००० महिलांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये आनंद, उत्साह आणि सामाजिक सहभाग वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. महिला सक्षमीकरणासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा विश्वास यावेळी आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
होम मिनिस्टर कार्यक्रमातील पाच विजेत्यांना दुचाकी भेट देताना अनिल टिंगरे, वंदनाताई खांदवे, संतोषलाला खांदवे व इतर.















