• Home
  • क्राईम
  • टिव्ही बंद करण्याच्या कारणावरून मुलाने केला बापाचा खून

टिव्ही बंद करण्याच्या कारणावरून मुलाने केला बापाचा खून

पुणे : लो. टाईम्स प्रतिनिधी

दसऱ्याच्या दिवशी काल (दि.2 ऑक्टोबर) रोजी कोथरूड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जय भवानी नगरमधील चाळ क्रमांक दोन येथे राहणाऱ्या पायगुडे कुटुंबात टिव्ही बंद करण्याच्या किरकोळ वादातून मुलाने वडिलांचा खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून, आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (३३) याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. तानाजी यांच्या पत्नी सुमन पायगुडे यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुरुवारी दुपारी साधारण बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी तानाजी यांनी मुलाला टीव्ही बंद करून स्वतःच्या डोळ्यात औषधाचे ड्रॉप टाकण्यास सांगितले. यावरून बाप लेकामध्ये वाद झाला. रागाच्या भरात सचिनने स्वयंपाक घरातील चाकू उचलून वडिलांच्या चेहऱ्यावर व गळ्यावर वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वत्र हळहळ व्यक्त करत आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top