काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कात्रज येथे प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत वडगावशेरी मतदार संघातील काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील जुन्या पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री पंकजा मुंडे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, माजी आमदार जगदीश मुळीक, शहराध्यक्ष धीरज घाटे, मंगेश गोळे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला.
भाजपा मध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र खांदवे, काँग्रेसचे जुने निष्ठावंत दिपक खांदवे पाटील, श्री क्षेत्र लोहगावचे माजी उपसरपंच सोमनाथ खांदवे पाटील, माजी शिक्षण मंडळ सदस्य नानासाहेब नलावडे, काँग्रेसचे भुजंग लव्हे, राहुल लव्हे, राष्ट्रवादी कॉग्रेस माथाडी आघाडीचे महेश पाटील यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
या पदाधिकाऱ्यांच्या भाजपा प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २ व ३ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराना आणखीन ताकद मिळणार आहे.















