काँग्रेसलाच विजयी करा – सागर खांदवे
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३ विमान नगर- लोहगाव- वाघोली मधील काँग्रेसचे उमेदवार सागर शिवाजी खांदवे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. संजय पार्क, रामवाडी मध्ये त्यांनी घरोघरी जाऊन मुस्लिम, दलित व इतर वर्गातील मतदारांना काँग्रेसलाच विजयी करण्याचे आवाहन केले. सागर खांदवे हा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असल्याने तो प्रचारासाठी गेला असता मतदार स्वतःहून त्यास आर्थिक मदत करत असल्याचे चित्र प्रभागात पाहायला मिळत आहे.


सागर खांदवे या युवकांने आतापर्यंत वेगवेगळ्या नागरी प्रश्नावर आवाज उठवला आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामातील भ्रष्टाचार असो, खड्डे मुक्त रस्ते असो, पाणी, कचरा, वीज या समस्यावर नागरिकांच्या वतीने त्यांनी वेगवेगळी आंदोलने करून निवेदने देऊन प्रश्न मार्गी लावले आहेत. पुरोगामी विचार सरणी असणारा एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती निवडणूक का लढवू शकत नाही, याचे उदाहरण दाखवण्यासाठी तसेच समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची तळमळ असल्याने सागर खांदवे निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे पंजा चिन्ह त्यांच्याकडे असल्यामुळे सर्व वर्गातील मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. युवा, प्रामाणिक, पॉझिटिव्ह चेहरा असल्याने मतदार त्यांना स्वीकारत असून चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रस्थापित धनदांडग्यांना डावलून रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यामधील आपण असल्याने आपल्याला मतदान करावे असे आवाहन सागर खांदवे यांनी केले आहे.















