एक शाम रामजी के नाम कार्यक्रम उत्साहात
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
एक शाम राम के नाम, भक्त स्नेह मिलन सोहळा पोरवाल रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स याठिकाणी नुकताच झाला.
प्रभू श्रीराम यांच्या राम दरबार मूर्ती स्थापनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये राम भक्ती पर भजन गिते, लहान मुलांचे ग्रुप डान्स तसेंच महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे मनोज पोचट, श्रीकांत मलारेड्डी, थानारामजी चौधरी, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव यांच्या सह अनेक लोकांची उपस्थित होती. कार्यक्रमासाठी सहकार्य मुकेश गोयल, अशोक तिवारी, विनीत वाजपेयी व संघ स्वयंसेवक यांचे लाभले. कार्यक्रमाचे आयोजन रामभक्त संतोष लाला खांदवे- पाटील व वंदनाताई खांदवे यांनी केले होते.
ओळ: पोरवाल रस्ता लगत असलेल्या महालक्ष्मी लॉन्स येते एक शाम राम के नाम या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित संतोष खांदवे, वंदनाताई खांदवे, अनिल टिंगरे व मान्यवर.


















