उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद
लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे लोहगाव मधील मेडिकल वगळता सर्व दुकाने, भाजी विक्रेते यांनी आज गुरुवार स्वयंस्फृतीने उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. सोशल मीडियावरून करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
संत तुकाराम महाराजांचे आजोळ म्हणून ओळखले जाणारे लोहगाव नेहमी पुरोगामी विचार सरणी जपत आलेले गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील रहिवाशी पवार कुटुंबावर प्रेम करणारी आहेत. लोहगाव मधील अनेकाना ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री कै. अजित पवार नावानिशी ओळखत होते. मात्र अचानक अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. अनेकांनी बारामती कडे धाव घेतली.
आज गुरुवारी लोहगाव बंद ठेवण्याचे आवाहन सोशल मिडिया मधून सर्वत्र फिरले होते. त्यानंतर आज सकाळ पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.




















