• Home
  • क्राईम
  • आमदार धक्काबुक्की प्रकरण; विमानतळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल
Image

आमदार धक्काबुक्की प्रकरण; विमानतळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल

लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
लोहगाव येथील गाथा लॉन्स मध्ये आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान आमदार बापुसाहेब पठारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते बंडू खांदवे यांच्यात जोरदार राडा झाला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पठारे- खांदवे मधील संघर्ष आणखीन पेटण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या चालकांनी दिलेल्या तक्रारी वरून २० जणां विरुद्ध गुन्हा

  आमदार बापुसाहेब पठारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या चालकाला जबर मारहाण करून दोन तोळ्यांची सोन्याची चैन व रोख रक्कम चोरल्याची तक्रार चालक शकील अजमोद्दीन शेख (वय ४६, रा. तुकाराम नगर, खराडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी प्रथम दिनांक ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता २० जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
   चालक शेख यांनी दिलेल्या तक्रारी वरून   लोहगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकर्ते १) बंडु शहाजी खांदवे,  २) शेखर मोझे, ३) विलास खांदवे, ४) कालीदास खांदवे, ५) गणेश खांदवे, ६) रामेश्वर पोळ, ७) मेघराज खांदवे, ८) प्रतिक खांदवे, ९) सागर करजे, १०) ओमकार खांदवे उर्फ ओम्या, ११) हरीदास खांदवे, १२)  तुकाराम खांदवे, १३) मंगेश खांदवे, १४) रामदास खांदवे व इतर ५ ते ६ अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
 आमदार पठारे यांना धक्काबुक्की झाल्या नंतर त्यांचे चालक शकील शेख हे त्यांना वाचविण्यासाठी गेले असता त्याचा मनात राग धरून १५ ते २० जणांनी मिळून शेख यांना जबर मारहाण करून दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, रोख एक हजार रुपये चोरल्याचे तक्रारी मध्ये नमूद केले आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा ?

 विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 496/2025 असा दाखल झाला असून, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(2), 118(1), 189(2), 190, 352, 191(2), 304 (2) अन्वये आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात गंभीर स्वरूपाच्या कलमांचा समावेश आहे. 
आमदारांच्या चालकांनी दिलेल्या तक्रारी नंतर दोन दिवसांनी बंडू खांदवे यांनी देखील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आमदारांसह मुलांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जन आंदोलना वरून झालेल्या वादातून आमदार बापुसाहेब पठारे त्यांचे चालक शकील शेख यासह ९ जणांविरुद्ध ५००/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२) ११८ (१) १८९(२), १९०,१९१(२), ३०४(२), ३५१(२), ३५२, प्रमाणे बंडु शहाजी खांदवे, (वय ४९ वर्षे, रा. लोहगाव) यांनी आमदार बापुसाहेब पठारे, त्यांची दोन मुले, पुतण्या यांच्या विरुद्ध दिनांक ९ ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये चालक १) शकील अजमोद्दीन शेख, २) श्री. बापुसाहेब पठारे (आमदार), ३) महेद्र आबा पठारे, ४) सुरेद्र बापूसाहेब पठारे, ५) रवींद्र बापूसाहेब पठारे, ६) किरण बाळासाहेब पठारे, ७) सागर नारायण पठारे, ८) सचिन किसन पठारे, ९) रुपेश मोरे (सर्व रा. खराडी)
या सर्वां विरुद्ध शिवीगाळ करणे, मारहाण करणे, धमकी देणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. तर किरण पठारे यांनी सात तोळे वजनाची सोन्याची चैन चोरल्याची तक्रार बंडू खांदवे यांनी दिली आहे.

या दोन्ही परस्पर विरोधी गुन्ह्याचा तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव करत आहेत.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top