• Home
  • क्राईम
  • आमदार धक्काबुक्की प्रकरण; चालकाने दिली २० जणांविरुद्ध तक्रार
Image

आमदार धक्काबुक्की प्रकरण; चालकाने दिली २० जणांविरुद्ध तक्रार

लोहगाव: प्रतिनिधी

आमदार बापुसाहेब पठारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या चालकाला जबर मारहाण करून दोन तोळ्यांची सोन्याची चैन व रोख रक्कम चोरल्याची तक्रार चालक शकील अजमोद्दीन शेख (वय ४६, रा. तुकाराम नगर, खराडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
चालक शेख यांनी दिलेल्या तक्रारी वरून जखमी लोहगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकर्ते १) बंडु शहाजी खांदवे, ( रा. लोहगाव आठवडा बाजार जवळ, लोहगाव), २) शेखर मोझे, ३) विलास खांदवे, ४) कालीदास खांदवे, ५) गणेश खांदवे, ६) रामेश्वर पोळ, ७) मेघराज खांदवे, ८) प्रतिक खांदवे (सर्व रा. दादाची वस्ती, लोहगाव), ९) सागर करजे, १०) ओमकार खांदवे उर्फ ओम्या, ११) हरीदास खांदवे, १२) तुकाराम खांदवे, १३) मंगेश खांदवे, १४) रामदास खांदवे व इतर ५ ते ६ अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार लोहगाव- वाघोली रस्त्यावरील गाथा लॉन्स येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा च्या दरम्यान घडला.
आमदार पठारे यांना धक्काबुक्की झाल्या नंतर त्यांचे चालक शकील शेख हे त्यांना वाचविण्यासाठी गेले असता त्याचा मनात धरून १५ ते २० जणांनी मिळून जबर मारहाण करून दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, रोख एक हजार रुपये चोरल्याचे तक्रारी मध्ये शेख यांनी नमूद केले आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा ?

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 496/2025 असा दाखल झाला असून, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(2), 118(1), 189(2), 190, 352, 191(2), 304 (2) अन्वये आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात गंभीर स्वरूपाच्या कलमांचा समावेश आहे.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, उप निरीक्षक नितीन राठोड यांनी भेट दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top