आजारी नागरिकांना दर दिवशी एक हजार रुपये देणार- गिरीश जैवळ
प्रभाग क्रमांक १ मध्ये विविध योजना
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
जसजशी निवडणुक जवळ येत आहे तसे मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल दिसतो आहे. लाडकी बहिण्याच्या एक गुंठा योजनेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) चे इच्छुक उमेदवार गिरीश जैवळ यांनी शिवसेना आरोग्य सुरक्षा योजना काढली असून यामध्ये आजारी रुग्णांना दर दिवसाला एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती उपविभाग प्रमुख गिरीश जैवळ यांनी दिली.
गिरीश भीमराव जैवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री वेलफेअर फाऊंडेशन तर्फे प्रभाग क्रमांक १ – कळस – धानोरी- लोहगाव येथील ५० हजार नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत आरोग्य संरक्षण योजना राबवली जाईल. ही योजना सर्वसामान्य कुटुंबांना अचानक येणाऱ्या हॉस्पिटल खर्चाच्या धक्यापासून आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने तयार केली आहे. योजनेचा कालावधी ५ वर्षे असणार आहे. एका वर्षात ३० दिवस योजनेचा लाभ घेता येणार असून दररोज १ हजार रुपये मदत दिली जाईल. जर एखादा व्यक्ती ५ वर्षांत एकूण १५० दिवस जरी आजारी पडला तरी त्यास एकूण १ लाख ५० हजार रुपया पर्यंत लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकाला हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास प्रतिदिन १,००० रुपये इतकी निश्चित आर्थिक मदत मिळेल. एका वर्षात कमाल ३० दिवसांपर्यंत हा लाभ उपलब्ध राहील, म्हणजेच एका वर्षात एकूण ३०,००० रुपयांपर्यंत संरक्षण मिळेल.
हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर नेमका फायदा
!रुग्ण हॉस्पिटल मध्ये भरती झाल्यास, तो रुग्ण हॉस्पिटलमध्ये राहिलेल्या प्रत्येक पूर्ण दिवसासाठी १,००० रुपये आर्थिक मदतीचा हक्कदार असेल. हा लाभ रुग्णाला हॉस्पिटलमधून सुटी मिळेपर्यंत किंवा सलग अथवा मिळून ३० दिवस भरती राहिल्यास ३० दिवस पूर्ण होईपर्यंत लागू राहील. रुग्णाला हॉस्पिटल मधून सुट्टी झाल्यास व डिस्चार्ज कार्ड दाखवल्यास २ आठवड्यांच्या आत रक्कम अधिकृत बँक खात्यात जमा होईल. यासाठी नागरिकांकडून एक रुपयाही प्रीमियम आकारला जाणार नाही.
योजनेसाठी कोणत्याही नागरिकाला स्वतःकडून काहीही रक्कम भरावी लागणार नाही. संपूर्ण विमा प्रीमियम गिरीश भीमराव जैवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री वेलफेअर फाऊंडेशनकडून भरला जाईल. योजना सर्व प्रकारच्या आजारांसाठी लागू, अपघातांना तात्काळ कव्हर होईल. ही हॉस्पिटल कॅश योजना सर्वसाधारण आजारांपासून ते गंभीर आजारांपर्यंत सर्व प्रकारच्या आजारांसाठी लागू असेल. अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास कव्हर तात्काळ सुरू होईल, तर इतर आजारांसाठी विमा नियामक संस्था (IRDA) च्या नियमांनुसार प्रतीक्षा कालावधी लागू राहील. गिरीश जैवळ म्हणाले, आरोग्य क्षेत्रात काम करून गरीब रुग्णांना मदत करण्याची खूप इच्छा होती. यामुळे ही योजना पुढे आणली आहे. या योजनेला प्रभागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी गिरीश भीमराव जैवळ यांच्या पोरवाल रस्ता लोहगाव येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.















