रेखाताई टिंगरे यांचे ठरलं राष्ट्रवादी पुन्हा (घड्याळ)
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस(अजितदादा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार गट) असा आता पर्यंत राजकीय प्रवास केलेल्या प्रभाग क्रमांक एक च्या माजी नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाकडे आपला मोर्चा वळविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा या घड्याळाच्या स्टेट्स ठेवायला सुरवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग १ क्रमांक एकच्या तीन वेळेच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी आता पर्यंत वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करून नगरसेवक पद भूषविले आहे. मागील विधानरसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला होता. जानेवारी मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी सर्व प्रथम भाजपकडे चाचपणी केली. तिकडे विरोध होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडे प्रयत्न केले. तिकडेही विरोध झाला होता. स्थानिक पातळीवरून त्यांना विरोध होत होता. अखेर अजितदादा यांना मनविण्यात ते यशस्वी झाले असल्याची चर्चा आहे. नुकतीच दादांची त्यांनी भेट झाली असल्याने त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा असा आपला स्टेट्स ठेवला आहे.
रेखाताई टिंगरे यांचा अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यास प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादीचे पॅनल मजबूत होणार आहे. पुरुष खुल्या गटातून शशीअण्णा टिंगरे आणि ओबीसी महिला मधून रेखाताई टिंगरे या उमेदवार असू शकतात. त्यांच्या पॅनल ची लढत भाजपचे माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे किंवा वंदनाताई संतोष लाला खांदवे किंवा पूजाताई धनंजय जाधव यांच्याशी होऊ शकते. एकंदरीतच प्रभाग एक मधील लढत तुल्यबळ होणार आहे.















