• Home
  • क्राईम
  • प्रयेसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या
Image

प्रयेसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

प्रयेसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या युवतीचा मृतदेह प्रियकराच्या खोलीत तर प्रियकराचा रेल्वे रुळाच्या बाजूला आढळला

लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी

प्रेयसीची हत्या करून प्रियकराने रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
संगमवाडी येथे घडली. युवक युवतीच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. मयत युवतीचे वडील पुणे शहर पोलिस दलात येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत येरवडा पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.

संगमवाडीत भाडेतत्त्वावर राहणारा गणेश शाहूराव काळे (वय २८, सध्या रा. संगमवाडी, पुणे, मूळ रा. बीड) आणि दिव्या संतोष निघोट (वय २३) असे मृत युवक युवतींची नावे आहेत. दिव्या चा मृतदेह प्रियकराच्या संगमवाडी येथील घरी आज (रविवारी) दुपारी सापडला. तर गणेश याचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील भेगडेवाडी येथे आढळून आला. त्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय आहे.
पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि दिव्या रुबी हॉल क्लिनिक याठिकाणी पॅथॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये काम करत होते. दोघे एकाच ठिकाणी असल्यामुळे दोघांचे प्रेम संबंध होते. दिव्या चे पंधरा दिवसांपूर्वी दुसऱ्या मुलांशी लग्न जमले होते. लग्नाची खरेदी देखील सुरू होती. दिव्या शनिवारी (दिनांक २९) रोजी घरातून कामाला जातो असे सांगून गेली. कामावरून ती पिक्चर बघायला जाणार असून घरी येण्यास उशीर होणार असल्याचे बहिणीला तिने सांगितले. शनिवारी ती उशिरा झाला तरी घरी परतली नाही. तिचा फोन बंद लागत होता. घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला असता, ती सापडत नसल्याने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिव्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तिचा शोध सर्वत्र सुरू होता. तिचे मोबाईलचे लोकेशन संगमवाडी येथे आल्याने रविवारी सकाळी वडील गणेश काळे रहात असलेल्या घरी पोहचले. घर बंद असल्याने येरवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडला असता दिव्या मृत अवस्थेत आढळली. तिच्या नाकावर जखम आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, गणेश काळे याचा शीर नसलेला मृतदेह तळेगाव दाभाडे याठिकाणी भेगडेवाडी रेल्वे स्टेशन च्या पुढे कडेला पडलेला आढळून आला. याबाबतची तक्रार आरपीएफ जवान सुधीर गिऱ्हे यांनी चिंचवड पोलिस स्टेशन येथे दिली आहे.

गणेश याने रेल्वे खाली आत्महत्या केली की अन्य काय घातपात झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
दोघां युवक युवती च्या अशा मृत्यूमुळे खळबळ माजली आहे.
प्रेम प्रकरणातून आणि दिव्याचे लग्न ठरल्याच्या कारणावरून गणेश ने दिव्याचा खून करून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे. मात्र गणेशाचा मृतदेह पाहता संशयास्पद निर्माण होत आहे. दिव्याचे वडील येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आहेत. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

Releated Posts

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

लोहगाव- वाघोलीत मंगळसूत्र चोरांचा उच्छादमहिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी लोहगाव / वाघोली परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

दुषित पाण्यामुळे १२ मुलींना विषबाधा; महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखलआरोग्य विभागाच्या टीमने घेतले पाण्याचे नमुने वडगावशेरी :…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून

शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येरवेड्यात एकाचा खून येरवडा : प्रतिनिधीयेरवडा शिवीगाळ केल्याच्या कारणावरून लाकडी बांबूच्या दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 21, 2026

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप

एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा;कॉलेज प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा विद्यार्थिनीं पालकांचा आरोप लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 14, 2026
Scroll to Top