निकृष्ट रस्त्याची तक्रार असताना बिल काढली; सागर खांदवे यांनी केले उपोषण
लोहगाव: टाईम्स प्रतिनिधी
लोहगाव मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोहगाव वाघोली रस्त्यावरील राज्य महामार्ग 68 कळस धानोरी लोहगाव वाघोली केसनंद राहू या रस्त्यावरील लोहगाव हद्दीतील संत नगर ते दादाची वस्ती या एक किलोमीटर रस्त्यावरील काँक्रिटीकरण कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत व चौकशी अहवाल गेले अडीच वर्षे साधरण केल्या विरोधात राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सागर खांदवे यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. चौकशीचे लेखी पत्र घेतल्यानंतर आमदार बापुसाहेब पठारे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याच्या हस्ते सायंकाळी खांदवे यांनी उपोषण सोडले.
सागर खांदवे म्हणाले, एकदिवसीय उपोषणाला दिवसभर लोहगावकरांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. या उपोषणाला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजय पाटील यांनी भेट देऊन येत्या दोन महिन्यांमध्ये सदर चौकशीचा अहवाल सादर करण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर चौकशी सुरू असताना काढल्या गेलेल्या बिलांबाबत वरिष्ठांकडून या संदर्भाची चौकशी करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सुरेंद्र पठारे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आशिष माने कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू कार्याध्यक्ष अझरखान प्रभाग क्रमांक दोन अध्यक्ष सुभाष ठोकळ, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस केशव राखपसरे, शिवसेना याबाठाचे विभाग प्रमुख बाळासाहेब खांदवे, शिवसेना शाखा अध्यक्ष लोहगाव निखिल खांदवे, शिवसेना प्रभाग प्रमुख संजय मोझे शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ खांदवे शिवसेना नेते काळुराम साठे , विलास खांदवे , लोहगाव चे माजी उपसरपंच सोमनाथ खांदवे व शिवसेना लोहगाव शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर सनी पांडुरंग खांदवे अक्षय खांदवे ऋषिकेश बालघरे ओंकार बालघरे सवेंदू शिंदे, योगिताताई राखपसरे, संतोष राखपसरे व मोठ्या संख्येने लोहगावकर उपस्थित होते.
ओळ: लोहगाव मुख्य चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करताना सागर खांदवे, आमदार बापुसाहेब पठारे व इतर.















