उज्जैन साठी अनिल सातव यांची चौथी ट्रेन भाविकांनी व्यक्त केले समाधान
लोहगाव : टाईम्स प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक तीन लोहगाव- विमाननगर- वाघोली चे इच्छुक उमेदवार अनिलभाऊ सातव- पाटील फाउंडेशनतर्फे श्री कालभैरवनाथ जन्मोत्सव पर्वानिमित्त आयोजित उज्जैन आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्या साठी रेल्वे खडकी स्टेशन हून रवाना झाली. ट्रेन चे पूजन करून हिरवा झेंडा पूजन अ भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, शिरूर- हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या उपस्थित झाला. या यात्रेसाठी लोहगाव विमाननगर सोमनाथनगर परिसरातील असंख्य भाविकांनी श्रद्धा, भक्तीभाव आणि आनंदाने सहभाग नोंदवला आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सर्व सोय भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अनिल सातव, सुनीता अनिल सातव यांनी केले आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
लोहगाव मधील यात्रेकरू इराणा मामीलवाड म्हणाले, अनिल सातव यांच्या वतीने चांगली सोय करण्यात आली आहे. नक्कीच त्यांना निवडणुकीत महाकालेश्वराचे आशीर्वाद मिळतील.
ओळ : अनिलभाऊ सातव फाउंडेशन तर्फे उज्जैन यात्रेसाठी खडकी येथून ट्रेन रवाना झाली.















